मुंबई :वीर भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 18 डिसेंबर, 2023 रोजी गोखले बॅंक्वेट हॉल,पनवेल जि. रायगड मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक मा.मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक विभाग , मा.प्रधान सचिव श्री. विकास खारगे तसेच मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मा.संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. या वेळी झालेल्या पोवाडा व कविता सादरीकरण कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले.सांस्कृतिक कार्यक्रमात शिवरत्न, शिवशाहीर वैभव घरत, शाहिर अभिषेक पाटील, सहगायक संदेश गावंड हामोनियम वैभव जोशी, ढोलकी तेजस पाटील आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच कवयित्री कविता काळे यांनी कविता सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रशांत तांबे,श्री.अतुल शिलवंत, यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुरेश तावरे, श्री.अरुण शिंदे, श्री.प्रदीप शिंदे, श्री.चंद्रकांत साळुंखे, श्री.अमर गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम केले. कवयित्री अरुणा कालेलकर, कवयित्री दया चव्हाण, कवयित्री सविता काळे, श्री.हरेश खैरे, श्री.राजेश नगरकर , श्री.प्रेमलाल ठाकूर, श्री.अतुल शिरवळकर, श्री.रोहित सिंग, श्री.विनोद केदारे उपस्थित होते. त्यांना पुषपगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत केले. अरुणा कालेलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन श्री.आर्यन देसाई, यांनी केले.
Home Breaking News वीर भाई कोतवाल जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन