उल्हासनगर (प्रतिनिधी – प्रमोद दळवी)तेजस मेघा फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत महेंद्र तुपे निर्मित आणि महेश्वर भिकाजी तेटांबे दिग्दर्शित “फरफट” या सामाजिक मराठी चित्रपटाचा रसिक प्रेक्षकांच्या आग्रहाखातर फक्त एकच शो उल्हासनगर येथील व्हिनस टॉकीज येथे रसिकांच्या तुडुंब गर्दीत पार पडला. यावेळी निर्माते महेंद्र तुपे, या सिनेमातील मध्यवर्ती म्हणजे आईची भूमिका साकारणारे मेघा डोळस तसेच बाबांची भूमिका साकारणारे संदीप जाधव, प्रमोद दळवी, यशवंत मुसळे, महेश्वर तेटांबे, रंगभूषाकार नाना जाधव, सचिन सावंत, आदी कलावंत, तंत्रज्ञ आणि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मेघा डोळस, संदीप जाधव, प्रमोद दळवी यांनी “फरफट” चित्रपटाविषयी आपापली मनोगते व्यक्त केली दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी फरफट सिनेमाच्या माध्यमातून व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर तिने केलेली मात आणि हे सर्व करत असताना त्यात तिची झालेली फरफट हे या चित्रपटात मांडण्याचा मी प्रामाणिक आणि कसोशीने प्रयत्न केला असून काही तांत्रिक बाबी सोडल्या तर हा सिनेमा उकृष्टरीत्या झाला आहे असे प्रतिपादन केले. तर महापौर लीलाबाई आशान यांनी प्रत्येक महिला वर्गानी हा सिनेमा आवर्जुन पहावा असे आवाहन केले. याप्रसंगी माननीय महापौर लीलाबाई आशान, माजी नगरसेवक प्रमोद टाले, संजय मढेवर, प्रशांत धांडे, समाजसेवक संदिप डोंगरे, संदिप लांडगे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते खानदेश सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नितीन जावळे, दाक्षिणात्य अभिनेते गणेश वाघ, डॉ. मधुकर हुजरे, एकनाथ घोलवड, मनोहर तायडे, भीमराव साळवे, राजू मोरे, कवी मंगेश सरदार, उल्हासनगर मराठी पत्रकार संघाचे पत्रकार, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. हा सिनेमा एकच शो म्हणून प्रदर्शित करण्यासाठी उल्हासनगर मधील प्रसिद्ध पत्रकार प्रमोद दळवी यांनी विशेष मेहनत घेतली. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या फरफट या सामाजिक सिनेमाला मिळत असून या सिनेमाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे