कासार पिंपळगावच्या सनग्लोरी ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी च्या गुळ उद्योग प्रकल्पाच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न

0

अहमदनगर (सुनिल नजन/ अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील सनग्लोरी आॅरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या गुळ उद्योग प्रकल्पाच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ संस्थेचे संचालक विजय म्हातारदेव राजळे आणि संचालिका सौ.अलकाताई विजय राजळे यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते क्रुषिमीत्र संदिपजी राजळे हे होते. या गळीत हंगामात एक हजार टण उस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.”gudone”या नावाने हा गुळ संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. नगर, पुणे जिल्ह्यात या सेंद्रिय गुळाला प्रचंड प्रमाणात मागणी असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष संदिपजी राजळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here