आमदार सुहास (आण्णा)कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर युवासेनेच्या वतीने मनमाड रेल्वे स्टेशन प्रबंधक नरेंद्रजी यादव साहेब यांना निवेदन देण्यात आले

0

मनमाड : मनमाड शहरातील मालेगाव – नगर हायवे वरील रेल्वे ओव्हरब्रीजचा भाग कोसळल्यामुळे सदरील रस्ता हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असल्यामुळे मनमाड शहराचे दोन तुकड्यात मधोमध विभागणी झाली आहे. यामुळे पर्यायी मार्ग हे गावाबाहेरून जात असत्यामुळे वाहने त्यामार्गे वळवण्यात आली आहे. परंतु पायी जाणऱ्या नागरिकांसाठी स्टेशनचे दादर हा पर्याय पुलाचे काम होईपर्यंत उपलब्ध झाल्यास ते अत्यंत सोयीचे होईल. त्यामुळे शाळकरी विध्यार्थी, वयोवृद्ध यासाठी त्यांना या पुलाचे काम होईपर्यंत वापरास परवानगी देण्यात यावी.तसेच गर्डरशॉप येथील रेल्वे पूल हा सर्वसामान्य करिता वापरण्याची मुभा देण्यात यावी जेणेकरून शहरातील दोन्ही भाग विभागले असल्यास नागरिकांना सोयीचे वापर करण्यात येईल.मनमाड रेल्वे स्टेशन लागत दोन्ही बाजूस असलेले वाहन पार्किंग येथे मोठ्या अक्षरात वाहन पार्किंगचे दर असलेले फलक लावण्यात यावे तसेच सामान्य नागरिकांकडून जास्तीची दर आकारणी होत असल्यास कारवाई करण्यात यावी.त्यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, शहरप्रमुख मयुर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, आसिफ शेख स्वाक्षरी निवेदन देण्यात आले.त्यावेळी जेष्ठ नेते लालाभाऊ नागरे, लोकेश साबळे, ता.समन्वयक अजिंक्य साळी, युवासेना उपशहरअधिकारी ज्ञानेश्वर उगले, युनूस शेख, तमिज पठाण, सनी पगारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here