मनमाड बस स्थानकातून मालेगाव,येवला येथे जाण्यासाठी बसची शटल सेवा त्वरित सुरू करा या शिवसेनेच्या मागणीला यश व युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

0

मनमाड :मनमाड शहर हे दीड लाख लोक वस्ती असलेल्या शहर आहे या शहरातून रोज येवला मालेगाव येथे उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थी व व्यापारी शेतकरी नकोदार वर्ग तसेच मनमाड शहर हे रेल्वे जंक्शन असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी येते उतरून इतरत्र बसणे प्रवास करत असतात.मालेगाव नगर हायवे वरील मनमाड येथील रेल्वे ओव्हर ब्रिज चा काही भाग कोसळल्यामुळे सदरील रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे रोजच्या विद्यार्थी व प्रवासी शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या बस स्थानकातून बसची शटल सेवा त्वरित उपलब्ध करून दिल्यास त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहील. त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार नाही.तसेच मनमाड मार्गे शिर्डी नगर पुणे येथील लांब पल्ल्याच्या बस गाड्यांसाठी ही याव्यतिरिक्त जवळील पर्यायी मार्ग निवडण्यासाठी एसटी डेपोच्या अधिकाऱ्यांमार्फत सर्वे करून रस्ता ठरवण्यात येऊन तो प्रसिद्धीस दयावा.सदरील आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता हा निर्णय त्वरित होणे गरजेचे आहे आशयाचे निवेदन दि.29/11/23 रोजी मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या लेटरहेडवर देण्यात आले होते.या पत्राचं आज उत्तर देत. मनमाड आगर व्यवस्थापक श्री.अभिजीत चौधरी साहेब यांनी पत्रात म्हटले की सदर पत्राच्या अनुषंगाने विभागीय कार्यालयास पाठपुरवठा करून आज दिनांक 30/11/2023 पासून मनमाड-येवला व मनमाड-मालेगाव या मार्गावर बस शटल सेवा चालू करण्यात आली व युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या हस्ते शटल बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले.त्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,वाल्मीक आंधळे,लाला नागरे, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे तसेच मनमाड बस आगार प्रमुख श्री. अभिजीत चौधरी व बस आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here