मनमाड : मनमाड विभाग अंतर्गत विज कर्मचारी यांना शैक्षणिक अर्हता कारणांमुळे कमी केले होते. माननीय आमदार सुहास आण्णा कांदे साहेब यांनी या कर्मचाऱ्यांचा बेरोजगारी चा तसाच परिवाराच्या उपासमारीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय व ऊर्जा मंत्री महोदय यांचा पाठपुरावा केला यानंतर या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता पुर्ण करून देण्यासाठी 3 वर्षं चा अवधी देण्यात आला व या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र मधील सर्व कर्मचारी ना लाभ झाला.पण नाशिक विभागात त्या आदेशाच पालन होत नसल्याने हे कर्मचारी महावितरण विभाग कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले असता आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तत्काळ उपोषणस्थळी दखल घेऊन उपोषणकर्ते व महावितरण अधिकारी यांची बैठक बोलावली.व बैठकीत यशस्वी तोडगा काढुन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला व मनमाड विभागातील 4 जणांना ऑर्डर देण्यात आल्या असून उर्वरित कर्मचाऱ्यांना 2 ते 3 दिवसात ऑडर देण्यात येणार आहे.यावेळी महावितरण विभागाचे अधिकारी यांची बैठक आमदार कार्यालयात तातडीने फरहान दादा खान, शहरप्रमुख मयुर भाऊ बोरसे, तालुकाध्यक्ष साईनाथ भाऊ गिडगे बैठक बोलवली होती यावेळी बैठकीला, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी राजेभोसले साहेब, व्यवस्थापक HR बादल शिंदे साहेब, कार्यकारी अभियंता संजय तडवी साहेब,उपव्याथापक HR बगाड साहेब तसेच यावेळी आशिष यमगर, रामदास बाचकर, नितीन घुगे, नवनाथ बाचकर, सचिन रोटकर, अमोल आहेर आदी उपस्थित होते.अनेक दिवसांच्या मागणीला न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व विज कर्मचाऱ्यांनी आमदार सुहास आण्णा कांदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले,