राष्ट्रपतींनी दर्शन घेतले आणि शिंगणापूरचे देवस्थान शनिफेऱ्यात अडकले, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बोगस नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित करणार – ना.बावणकुळे

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे येऊन त्यांनी शनिदेवाचे दर्शन घेतले आणि तेलाने शनिदेवाचा महाअभिषेक ही केला. प्रसादालयात जाऊन प्रसादही घेतला.अगोदर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री ना.राधाक्रुष्ण विखेपाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला आणि नंतर शनि शिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी राष्ट्रपतींना शनिप्रतिमा भेट दिली.राष्ट्रपतींनी ही शनि दर्शन घेऊन देवस्थान ट्रस्टचे तोंड भरून कौतुक केले.आणि आभार मानले.त्यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, बांधकाम मंत्री दादा भुसे, जिल्ह्यातील खासदार सुजयदादा विखे, सदाशिव लोखंडे, अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना ,नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिश येरेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.नंतर पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मूं रवाना झाल्या.नंतर सायंकाळी साडेसहा वाजता भाजपचे कार्यकर्ते ऋषिकेश शेटे आणि अशोक टेमक यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत उपोषण सुरू केले.उपोशनार्थींनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की शनिशिंगणापूर देवस्थानमधे शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सुरू असून या देवस्थान च्या प्रशासनास आळा घालण्यासाठी शनि शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे.व हे देवस्थान सरकार जमा करून तेथे नवीन प्रशासक नेमावा, आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध न करताच केलेल्या बोगस नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित करून उपोषणाला सुरुवात केली होती.या उपोषणात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अशोक टेमक, ऋषिकेश शेटे, बेल्हेकरवाडीचे सरपंच भरत बेल्हेकर,कांगोणीचे सरपंच बंडू शिंदे , सतिश गडाख, संदिप कुसळकर,प्रतिक शेजुळ,सचिन भांड,अमोल साठे, प्रताप चिंंधे, नानासाहेब ढेरे, संदिप दरंदले, भाऊसाहेब बेल्हेकर, संभाजी गडाख, अरूण चांदघोडे, कुशिनाथ ढेरे, हर्षद शिरसाठ,प्रकाश ढेरे, संभाजी क्षिरसागर, बाळासाहेब साबळे, गणेश चौगुले, हे सहभागी झाले होते.एक डिसेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावणकुळे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव लंघे यांनी या उपोशनाची दखल घेत उपोषणार्थीची भेट घेऊन चौकशीचे आश्वासन देत उपोषण सोडावयास लावले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी ही केस कोर्टात लढविण्यासाठी साठी लागणारा सर्व खर्च मी स्वतः करीन असे सांगितले.चंद्रशेखर बावनकुळे यांनी निक्षून सांगितले की “तुम्ही मला जे निवेदन दिले आहे त्या निवेदनावर मी सरकारशी बोलेन आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत बैठक लावेल.संस्थानचे पैसे चांगल्या मार्गाने खर्च व्हावेत ,भाविकांनी ज्या उद्देशाने दान दिले आहे तो उद्देश सफल झाला पाहिजे.”असे सांगून उपोषणाला पुर्णविराम दिला.सरकारला दिलेल्या निवेदनात १३२३+६०० लोकांची बोगस नोकरभरती, चोवीस तास लाईट असताना ४० लाखांच्या डीजल जनरेटरची खरेदी कशाला, चौथऱ्यावरील दर्शन पावत्या मध्ये गैरप्रकार,महागडी अंम्ब्युलंस खरेदी करून ती परिसरातील एका काॅलेजला नव्वद हजार रुपयांत दिली.मंदिर बांधकामासाठी वीस कोटी रुपये खर्चाचे निवेदन दिले होते प्रत्यक्षात पन्नास कोटी बारा लाख रुपये खर्च झाले तरी मंदिराचे बांधकाम पन्नास,साठ टक्केच झाले आहे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.एकंदरीत “राष्ट्रपतींनी दर्शन घेतले आणि शिंगणापूर देवस्थान शनीफेऱ्यात अडकले” असे म्हणण्याची वेळ भाविकांवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here