स्व.आसाराम गायकवाड स्मृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात सतरा नामांकित व्यक्तींना पुरस्कार प्रदान

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) पाथर्डी तालुक्यातील व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील आदिनाथ नागरी पतसंस्थेचे अनेक वर्षे व्हाइस चेरमन राहिलेले स्व. आसाराम गायकवाड यांच्या तेराव्या पुंण्यतीथी सोहळ्याच्या निमित्ताने सतरा आदर्श व्यक्तींना स्मृती गौरव ट्राँफी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ नागरी पतसंस्थेचे चेरमन अर्जुनराव राजळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. भाउपाटील राजळे हे होते. त्यांच्या प्रवचनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व आदर्श कारागीर,डॉक्टर, युवानेता,प्रगतशील शेतकरी, समाजकार्य, पत्रकारिता, उद्योजक, कवी, महिला, किर्तनकार, श्रावणबाळ, युवा सरपंच, दिव्यांग सेवक,गणेश मंडळ, सामाजसेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सतरा पुरस्कार्थीं व्यक्तींना “स्मृतीट्राँफी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मंगेश भगत, बाळासाहेब कोठुळे,भाउसाहेब शेलार, विजय कारखेले, सुभाष बर्डे, डॉ. बाळकृष्ण मरकड,वैष्णवी मुखेकर, अशोक मोरे, विजय राठोड, संगिता भापसे,अशोक खेडकर, गणेश पालवे, रामदास बर्डे, यशवंतराव मरकड, भरत दगडखैर,अण्णा दगडखैर,महारुद्र प्रतिष्ठान अशा सतरा जणांचा समावेश होता.प्रारंभी प्रास्ताविक दिव्यांग प्रहार संघटनेचे नेते विठ्ठल गायकवाड यांनी केले. बाळासाहेब कोठुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,विजय कारखेले,आणि आदिनाथ पतसंस्थेचे चेरमन अर्जुनराव राजळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी तर आभार पाथर्डी मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे यांनी मानले. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या योगिताताई राजळे, सरपंच मीनाताई शिरसाठ, तिसगाव येथील दुर्गाशंकर पतसंस्थेचे चेरमन पोपटराव पडोळे, व्यवस्थापक मारुती दगडखैर साहेब, आदिनाथ पतसंस्थेचे व्हा चेरमन बाबासाहेब बर्डे, सचिव मुकुंद गायकवाड, व्रुद्धेश्वरचे संचालक कुशिनाथ बर्डे, सोसायटीचे माजी चेरमन,मोहनराव दगडखैर,अशोकराव काजळे, शशिकांत गायकवाड, योगेश गायकवाड, अंकुश चितळे, कुशल भापसे, म्हातारदेव गायकवाड, नवनाथ वाघ,बंडू बर्डे, आबासाहेब बर्डे, संजय बर्डे, भाउसाहेब बलफे,धोंडीराम बर्डे, निलेश काजळे, बाबासाहेब घुले, शाम दगडखैर, किशोर फुंदे,सारंगधर बर्डे, तुषार बर्डे, संतोष कर्डीले, शिवाजी गायकवाड, आकाश बर्डे, आसाराम बांदल,संदिप गायकवाड, चारुदत्त वाघ,वैभव आंधळे, अच्युतराव वाघ,यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर उपस्थित होते.नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ही येउन आयोजक आणि पुरस्कार्थींना सुबेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here