अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) अहिल्यादेवीच्या जन्म गावी चोंडी येथील उपोशना बाबद सरकार कडून वाटाघाटी फिस्कटल्या नंतर तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज आता आक्रमक झाला असुन मुंबईत झालेल्या बैठकीचा चार पानी आदेशाचा व्रुतांत उपोषण स्थळी वाचून दाखवल्या नंतर त्या आदेशाची होळी करण्यात आली.आ. प्रकाश शेंडगे यांनी हे आंदोलन आता कोणाच्याही हातात राहीले नसुन सरकारने मराठा समाजा प्रमाणे काही तरी ठोस निर्णय घेऊन हे आंदोलन सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईहुन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी गेलेले उपोशनार्थी अण्णा साहेब रुपनर हे ससुन मधुन उपचार घेउन अँब्युलंस मधून थेट चोंडीत दाखल होताच सरकारने तिन महिन्याची मुदत मागीतली ती आम्हाला मांन्य नाही असे सांगून त्या सरकारी आदेशाच्या पानाची होळी करत आता आमचा प्राण गेला तरीही मागे हटणार नाही असा निर्णय जाहीर केला.रुपनर यांनी असा आरप केला की सरकारने धनगरांना सत्तर वर्षे फसवले तसे आता ही धनगर समाजाला फसवन्याचे सरकारचे षडयंत्र चालू आहे.आता एसटी प्रमाणपत्र मिळाल्या शिवाय चोंडी सोडणार नाही.आता आमचा प्राण गेल्यावरच हे उपोषण थांबणार आहे असा निर्धार त्यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यासमोर व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील तालुक्यात, गावात, वाड्या वस्त्यावर हे आंदोलन सुरू करण्याचे त्यांनी आवाहन केले. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले मा.आमदार प्रकाश शेंडगे,राहुरीचे धनगर समाजाचे नेते आणि बाजार समितीचे माजी उपसभापती अण्णासाहेब बाचकर, जालिंदर गढधे,नवनाथ बेंद्रे, संतोष धुळगंड,शांतीलाल कोपनर, कडा आष्टी येथील बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव ढवण,हनुमंत भिसे, दादासाहेब पारखे, परमेश्वर खेडकर, नवनाथ पांढरे, गौतम पारखे, रामहरी महानोर, कांतीलाल पानसरे, अनिल पालवे, आबा पालवे, भाउसाहेब ढोरमारे, प्रकाश खेडकर, यांच्या सह बारामती, इंदापूर, माळशिरस येथील कार्यकर्ते उपस्थित होते. एकंदरीत धनगर समाज आरक्षणाचा तिढा काही सुटत नसल्याने समाज आता अतिशय आक्रमक झालेला दिसत असून सरकारला धारेवर धरण्यासाठी आता आर या पार चा लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे.सरकारच्या आनखी तीन महीने मुदतीच्या वेळकाढूपणा मुळे समाज संतप्त झाला असुन समाजातील राजकीय पक्षाचा कोणताही नेता उपोषण सोडवण्यासाठी आला तर त्याला तीथुन हाकलून देण्याचे ठरले आहे. सरकारने धनगर आरक्षणासाठी तातडीनं निर्णय घेन्याची वेळ आलेली आहे. अशी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाची मागणी आहे. आरक्षण न मिळाल्याने आ.शिंदे आ.पडळकर, जाणकर यांच्या वर ही ताषेरे ओढण्यात आले.
Home Breaking News सरकारच्या आदेशाची चोंडीत पेटली होळी,धनगर आंदोलक आक्रमक, हे आंदोलन आता कोणाच्याही हातात...