भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

0

चांदवड : दि.१५/०८/२०२३ मंगळवार रोजी जि.प.प्राथमिक शाळा भडाणे ता-चांदवड येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली.विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला.यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहन मा.सरपंच यांचे वडिल श्री .शामराव काळू आहेर (जेष्ठ नागरीक) यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर जि.प.शाळा भडाणे येथे आर्मी मध्ये सेवा करणारे श्री . शरद आण्णा बनकर (चीन सीमेवर कार्यरत) यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.शिलाफलकांचे अनावरण स्वातंत्र्य सैनिक श्री.जगन्नाथ यशवंत शिंदे , संपत हरिभाऊ कळमकर ,भास्कर गटलू सोनवणे यांचे हस्ते करण्यात येऊन पंचप्राण शपथ घेण्यात आली .कलशाचे पुजन करण्यात आले.*स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थी व पालकांची निपून भारत अभियानाची शपथ घेण्यात आली.विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड चे ड्रेस वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली.दिपक वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ग्रामपंचायत भडाणे तर्फे मुलांना भिस्कीट पूडे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी राहूल वाघ ,संगमजी,मारुती सोनवणे, शालेय पोषण आहार शिजवणारे स्वयंपाकी सरला वाघ व मदतनीस रघूनाथ वाघ यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी सरपंच श्री.सुनिल आहेर, उपसरपंच श्री.भाऊसाहेब सोनवणे , ग्रामसेवक श्री .रावसाहेब खोकले भाऊसाहेब , पंचायत समिती सदस्य श्री . देविदास आहेर , पोलीस पाटिल श्री .सागर आहेर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री .अनिलजी आहेर, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.समाधान आप्पा आहेर, उपाध्यक्ष श्री .जगदिशभाऊ वाघ, अंगणवाडी ताई निकम मँडम ,शाळेतील शिक्षिका दुसाने मँडम , सोसायटी चेअरमन व सदस्य तसेच गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री.सूर्यकांत जाधव सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here