भारताची फाळणी देशाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना : ना.डॉ. भारती पवार

0

नाशिक :  नाशिक जिल्ह्यातील रामाचे पिंपळस,तालुका निफाड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने विभाजन विभिषिका स्मृती दिन,मेरी माटी मेरा देश व भव्य कार्यकर्ता मेळावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डॉ .भारती पवार यांनी मार्गदर्शन केले.”14 ऑगस्ट रोजी झालेली भारताची फाळणी भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस आहे. हा भारताच्या संघर्षाचा आणि त्यागाचा दिवस आहे “असे प्रतिपादन ना.डॉ. भारती पवार यांनी ह्या कार्यक्रमाप्रसंगी केले .विभाजन विभिषिका स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. ह्या कार्यकर्ता मेळाव्या पूर्वी निफाड चौफुली पासून तिरंगा यात्रेचा शुभारंभ करत छत्रपती शिवाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार हार घालत संपूर्ण निफाड शहरात ही तिरंगा यात्रा काढण्यात आली . शहरातील सर्वच नागरिकांनी उत्सूर्तपणे या तिरंगा यात्रेचे स्वागत करत देशभक्तीपर घोषणा देऊन ह्या यात्रेत आपलाही सहभाग नोंदवला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी तिरंगा ध्वज वाटप केले. ह्या यात्रेत स्वतः ना. डॉ. भारती पवार ह्यांनी दुचाकीवर स्वार होत असंख्य कार्यकर्ते व नागरिकांसह आपला सहभाग ह्या तिरंगा यात्रेत नोंदवला. ह्यानंतर रामाचे पिंपळस येथील कार्यकर्ता मेळाव्यास हजेरी लावत कार्यकर्त्यांना संबोधित केले.या प्रसंगी भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण,नाशिक जिल्ह्याचे भाजपा संपर्कप्रमुख राजेंद्र गावित, लोकसभा प्रभारी बाळासाहेब सानप, भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, भाजपा नेते केदा नाना आहेर, भाजपा नाशिक विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भाजपा नेते भूषण कासलीवाल,एन डी गावित, महिला आघाडीच्या सुवर्णाताई जगताप,अमृता ताई पवार, सचिन दराडे,निफाड तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, भाजपा नेते यतीन कदम,केशव सुरवाडे,कैलास सोनवणे, बापू पाटील, गणेश शिंदे,आनंद शिंदे, दिपक देसले,प्रमोद सस्कर, परेश शाह, सौ.सारिका डेरले, सौ रंजना शिंदे, दत्तराज छाजेड, तरंग गुजराथी, जय फुलवाणी,रवींद्र गांगोले ,सोपान दरेकर,संजय शेवाळे, संतोष काटे, युवराज पठाडे, संतोष केंद्रे, मनोज दिवटे,विठ्ठल गावित, रमेश थोरात, विजय कानडे, संजय सानप, उमेश उगले, रवी सानप, अमोल सानप,सुनील भोये, किरण कुलकर्णी,आदेश सानप, विष्णू डोमसे, उमेश नागरे, गौरव वाघ,संदीप निरभवणे, नितीन परदेशी, नितीन जाधव,प्रशांत गोसावी, राजेंद्र निकुळे, अरुण आव्हाड, विनायक खालकर, लक्ष्मण निकम, किरण कुलकर्णी,अल्पेश पारख, सुनील पवार,छगन तात्या कवडे, निलेश सालकडे, डॉ .रमेश सालकडे, संजय गाजरे, किशोर कदम,हेमंत बोरस्ते, सचिन धारराव, अरबाज पठाण, कैलास शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here