पंढरपूरहुन आलेल्या यादवबाबा दिंडीचे वाघोलीत जोरदार स्वागत

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलेल्या आणि दर्शन घेऊन पुन्हा पायी माघारी आलेल्या वै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या दिंडीचे वाघोलीत जोरदार स्वागत करण्यात आले.विना घेऊन पायी येणाऱ्या मानकरी भक्तामध्ये माजी सरपंच बाळासाहेब जमधडे,भिमराज दातीर,भारत लवांडे, रामनाथ नेहुल,शिवाजीराव कासार यां वारकऱ्यांचा समावेश होता.तिसगाव येथे अण्णा लवांडे यांच्या येथे मुक्काम करण्यात आला जवखेडे दुमाला येथे संतराम नेहुल यांच्या घरी नाष्ट्या नंतर वाघोलीत आगमन होताच बाबासाहेब जमधडे,साहेबराव दातीर यांनी पंचारतीने ओवाळणी केली. वाघोली सोसायटीचे संचालक पांडुरंग मुरलीधर दातीर यांनी प्रितीभोजन दिले. रमेश दातीर, नारायण दातीर, रामकिसन चव्हाण, कारभारी वांढेकर यांनी ही रस्त्यावर सडासमार्जन करत स्वागत केले. यादवबाबा मंदिरासमोर दिंडीत विषेश सहकार्य करणाऱ्या भाविकांना सन्मानित करण्यात आले.दिंडीचे व्यवस्थापक रमेश दातीर यांनी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात चहापाणी देऊन ८८वर्षाची परंपरा असलेल्या या दिंडी सोहळ्याची सांगता झाली.यावेळी ह.भ.प.अभिमंन्यु महाराज भालसिंग यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here