उपसरपंचपदी दशरथ माळी येवला तालुक्यातील धुळगाव ग्रुप ग्रामपंचायत चे उपसरपंच पदी दशरथ माळी यांची निवड

0

 धुळगाव : उपसरपंचपदी दशरथ माळी येवला तालुक्यातील धुळगाव ग्रुप ग्रामपंचायत चे उपसरपंच पदी दशरथ माळी यांची निवड आवर्तन पद्धतीने सौं शांताबाई नारायण बाराहते यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर दशरथ माळी यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला असता एकही अर्ज दाखल न केल्याने सर्वानुमते दशरथ माळी यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली यावेळी सरपंच रामदास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडीतके यांनी निवड प्रक्रिया पार पाडली तसेच यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत झाड लावून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाड जगवण्याची शपथ व प्रतिज्ञा यावेळी ग्रहण करून उपसरपंच पदी दशरथ माळी यांची निवड झाल्याने सहकाऱ्यांनी फटाके वाजवून तसेच पेढे वाटप करीत आनंद उत्सव साजरा केला यावेळी सरपंच रामदास इंगळे मावळत्या उपसरपंच सौ शांताबाई बाराहाते तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड सोमनाथ गायकवाड यांनी उपसरपंच दशरथ माळी यांचा शाल पुष्प व फुलहार देऊन सत्कार केला यावेळी योगेश गायकवाड दत्तू गायकवाड, सौ रुक्मिणी सोनवणे,
सौ दिपाली गायकवाड ,सौ वंदना गायकवाड, व आशाताई आहेर या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये
अण्णासाहेब गायकवाड ,बाळासाहेब गायकवाड, माणिकराव सूर्यवंशी, ऋषिकेश खोडके ,चंद्रभान गायकवाड ,सुभाष सोनवणे, भाऊसाहेब गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड ,वाल्मीक गायकवाड, चेतन गायकवाड, सुनील शिंदे,,दिलीप गायकवाड यांच्यासह अनेक गावकरी या निवड प्रसंगी उपस्थित होते. प्रतिनिधी:-शशिकांत जगताप.येवला,नाशिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here