एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प त्र्यंबकेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचं आयोजन करण्यात

0

  त्र्यंबकेश्वर:  एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प त्र्यंबकेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचं त्रंबकेश्वर बालविकास प्रकल्प अधिकारी मा. भारती गेजगे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्रंबकेश्वर, हरसूल येथील मुख्यसेविका यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.शिबीराचा उद्देश महिलांपर्यंत पोहोचावा म्हणुन यावेळी विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना विभागाच्या प्रतिनिधी मार्फत देण्यात आली.आपल्या क्षेत्रात प्रभावी व उकृष्ठ काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचे तक्रार अर्ज स्वीकारण्यात आले. कार्यक्रमासाठी तहसीलदार श्रीमती मंजुषा घाटगे मॅडम,आमदार साहेबांचें चिरंजीव वामन कोसकर, जिल्हापरिषद उपाध्यक्ष तसेंच बाजार समितीचे संचालक यांचे चिरंजीव रोहित सकाळे, महिला सरपंच, उपआयुक्त श्री. चंद्रशेखर पगारे ,प्रभारी जिल्हा व महिलाबाल कल्याण अधिकारी तथा बालविकास अधिकारी श्री.सुनिल दुसाने,कृषी अधिकारी पंचायत समिती सुनिल विटनोर,नगरसेविका श्रीमती त्रिवेणी तुंगार,माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रूपांजली माळेकर,श्री बापु अत्रे अनेक मान्यवर उपस्थित होते. 800 हून अधिक महिलावर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या, शिबिराचे ठिकाणी 339 समस्यांचे अर्ज प्राप्त झाले. सर्व अर्जांची छाननी व संगणकही प्रणालीवर नोंदणी होऊन विभागनिहाय त्याचे वाटप करण्यात येणार असून त्याप्रमाणे करण्यात येणाऱ्या निफ्टाराचे देखील अद्यावत माहिती संगणकीय प्रणालीवर नोंदवण्यात येणार असल्याची माहिती आयसीडीएस विभागामार्फत देण्यात आली.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर  स्त्री सन्मान पुरस्कारासाठी तात्काळ अर्ज करणे करता आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाची नियोजन एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प त्रंबकेश्वर व हरसुल येथील सीडीपीओ ,बाल विकास सेवा योजना वि.अ.शिलावट, चौधरी सर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका श्रीमती अन्नपूर्णा अडसुळे ह्यांनी केले.राष्ट्रीगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here