
परभणी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे परभणी येथे १०० खाटांच्या (एम.सी.एच.विंग )स्त्री रूग्णालय व डि.ई.आय.सी.च्या नवीन ईमारतीचे उद्धाटन संपन्न. जिल्ह्यातील आरोग्य सेवा उंचवण्यासाठी येथील सुविधांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी येथे प्रत्यक्ष काम करणा-या व्यक्ती सर्वात महत्त्वाच्या आहेत. राज्यात सन २०२२-२३ मध्ये आरोग्य यंत्रणांना विविध योजना राबविण्यासाठी निधी आवश्यक होता. तो मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सतत पाठपुरावा केला. माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी हे रुग्णालय होणे आवश्यक होते, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे परभणी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १०० खाटाच्या माता व बाल रुग्णालय आणि DEIC च्या नवीन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत,आमदार विप्लव बजोरिया, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार श्री डॉक्टर राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, आमदार श्री रत्नाकर गुट्टे,जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा,श्रीमती रश्मी खांडेकर, श्रीमती तृप्ती सांडभोर,डॉ. श्रीमती महानंदा मुंडे सहित पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
