
राज्य : केंद्रीय संशोधन संस्था कसौलीच्या भेटीदरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी अँटीसेरा विभागाला भेट दिली आणि अँटी-रेबीज सिरम आणि अँटी-स्नेक व्हेनम सीरमच्या निर्मितीचा आढावा घेतला. लस निर्मिती ही एक व्यापक संशोधन आणि कठीण प्रक्रिया आहे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या मागणीनुसार लस निर्मिती आणि पुरवठा जलद करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आणि केंद्रे तयार केली जात आहेत .
