
शिमला : केंद्रीय संशोधन संस्था कसौलीच्या 119 व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेश शिमला येथे पार पडला.तसेच या संस्थेचा वार्षिक अहवाल आरोग्य मंत्री कर्नल धनी राम शांडिल्य जी , क्रीडा मंत्री श्री विक्रमादित्य सिंग जी, खासदार सुरेश कश्यप जी यांच्यासमवेत प्रसिद्ध करण्यात आला.मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मा.केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार देशाच्या आरोग्याशी संबंधित जैवतंत्रज्ञानाच्या सीमावर्ती भागात अत्याधुनिक संशोधन व उत्पादनाच्या प्रगतीच्या दिशेने अथक प्रयत्न करत आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
