घरनिकी मध्ये आजी-माजी शिक्षक-विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

0

सांगली-आटपाडी (प्रतिनिधी-राहूल खरात)
नुकतंच घरनिकी तालुका आटपाडी, जिल्हा-सांगली येथे १० वी २००१, २००२ आणि २००३ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा न्यू हायस्कूल घरनिकी येथे संपन्न झाला.सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घरनिकी येथे पुष्प अर्पण आणि श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पूढे न्यू हायस्कूल घरनिकी च्या प्रांगणामध्ये मोठ्या जल्लोषात एकंदरीत २२ वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व माजी शिक्षक यांच्यावर पुष्प वर्षाव करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याचबरोबर न्यु हायस्कूल घरनिकी च्या सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले.कार्यक्रमासाठी पुणे, मुंबई, कलकत्ता, बेंगलोर, गुजरात आणि संपुर्ण देशभरातून माजी विद्यार्थी उपस्थित होते. सोबत सध्या शिकत असलेले विध्यार्थी सुध्दा हजर होते. माजी विद्यार्थ्यांचे मनोगत आणि सर्वांच्या जुन्या आठवणींनी संपुर्ण वातावरण आनंदमय झालं होत. माजी शिक्षकांना सुद्धा त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांच आज ही तेवढंच त्यांच्या प्रती असलेलं प्रेम बघून मन भरून आल. शेवटी स्नेहभोजन करून दोन्ही शाळांना भेटवस्तू देवून जड अंतःकरणाने सर्वांनी कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here