
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त थॅलेसेमिया उपचार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार थॅलेसेमिया सारख्या अनुवांशिक विकारांच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी कटिबद्ध आहेत असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.तसेच यावेळी थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासह बाल सेवा योजना पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले ज्यामध्ये Coal India Limited ने बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठी मदत केली आहे.
