
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज नवापाडा आणि गोलाबारी जिल्हा झाबुआ, मध्य प्रदेश येथे भेट दिली आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.यावेळी अनुसूचित आदिवासी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष,मा. खासदार समीर ओराव जी उपस्थित होते.
आदिवासी समाजाने संपूर्ण कुटुंब/समाजाच्या सामूहिक प्रयत्नातून हलमा परंपरेनुसार जलकुंभ आणि रस्ते बांधणी यांसारखी कामे पूर्ण केली आहेत. सेंद्रिय शेतीसारख्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांद्वारे जमिनीची सुपीकता वाढविण्याचे कामही केले जात आहे. यावेळी स्थानिक लोकांच्या चर्चेतून असे दिसून आले की माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हि विचारधारा जमिनीवर सकारात्मक प्रभाव टाकत आहे. असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
