राहुरी क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीला १६ जागा तर विरोधी भाजपच्या खासदार विखेंच्या विकास मंडळाला अवघ्या दोन जागा

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) नगर जिल्ह्यातील राहुरी क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या महाविकास आघाडीला १६ जागा मिळाल्या असुन भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या विकास मंडळाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत.महाविकास आघाडीचे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे-सर्व साधारण गटातून कवाणे दत्तात्रय(६८४मते),खुळे बाबासाहेब (७२४मते),जाधव रखमाजी(६९६मते),तनपुरे अरुण(८१४मते), पानसरे महेश(७१४मते), खेवरे सुनिता(८०८मते), डुक्रे शोभा(७०९मते), बाचकर रामदास(७६३मते),शेळके,दत्तात्रय(६९७मते),आढाव शारदा(४५८मते), गाडे मंगेश(४७८मते), पवार मधुकर(४६६मते), पवार गोरक्ष(४४३मते), पानसंबळ चंद्रकांत(३०८मते),बाफना सुरेशलाल(३१२मते),हारदे मारुती(१७१मते),तर विरोधी भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या विकास मंडळाचे सत्यजीत कदम(६६५मते), शामराव निमसे(६७०मते), याप्रमाणे मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उर्जा मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे.परंतु महाविकास आघाडीचे नारायण सोनवणे आणि विश्वास पवार यांना दोन चार मतानी पराभव पत्करावा लागला.ही निवडणूक बाजार समीतीची होती पण प्रचार मात्र आमदारकीचा होता अशी परिस्थिती निर्माण झाली होती.मतदारांनी विरोधी गटाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पुन्हा एकदा आमदार तनपुरे यांची तालुक्यावर मजबूत पकड असल्याचे सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here