
जळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील कंडारी येथे तुषार प्रभाकर सुर्वे (वय-41)- या तरूणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.
गावाच्या बाहेर खळ्यात तुषारचा मृतदेह आढळून आला. बुधवारी रात्री रायपूर येथील उपसरपंच वसंत सीताराम धनगर व तुषार दोघांनी खळ्यात मद्यप्राशन केले. त्यानंतर सकाळी तुषारचा मृतदेहच आढळून आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके,भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारूळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी केलल्या चौकशीत तुषार खळ्यात रखवालीसाठी गेला होता, तर वसंत धनगर यांचे वाघुर धरणाजवळ घर आहे. रात्री साठे आठ वाजेपर्यंतच आपण सोबत होतो, असे त्यांनी तपासात सांगितले आहे.
नेरी-गाडेगाव रस्त्यावर तुषार यांचे शेत व खळे आहे. तुषार हा खळ्यात पलंगावर मयतावस्थेत पडलेल्या असल्याची माहिती प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांनी कुटूंबाला कळविली. पत्नी मनिषा यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार याच्या पश्चात वडील प्रभाकर भाऊराव सुर्वे, पत्नी मनिषा, मुलगा ओम, भाऊ हेमंत आहे.
पोलीसांनी सापळा रचून गोपनीय माहिती संकलीत करून आरोपी विशाल देविदास मराठे, राहुल नरेंद्र जाधव, गोपाळ दिलीप भुसारी यांना कंडारी गावातुन ताब्यात घेतले आहे.
