
मुंबई : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड तर्फे गेली अठ्ठावीस वर्षे किल्ले रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार श्री शिवराजाभिषेक सोहळा* आयोजित करण्यात येतो. यंदा *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे. या दैदीप्यमान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष, माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांची दादर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व त्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केले. शककर्ते छत्रपति शिवाजी महाराज यांचा राजाभिषेक सोहळा हा आपल्यासाठी भाग्याचा दिवस असून तो तिथी नुसारच साजरा करायला हवा तसेच ३५० व्या शिवराजाभिषेकाच्या अनुषंगाने समितीने दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून, तिथीनुसार २ जून रोजी साजरा होणाऱ्या या सोहळ्यासाठी मी स्वतः किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहे असे श्री राजसाहेब ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले.
