
मनमाड : सिंधी समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल महाराज जयंती निमित्त आज आय यु डी पी मनमाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी उपस्थिती लावली. झुलेलाल महाराजांचे दर्शन घेत त्यांनी सर्व समाज बांधवांना या आनंददायी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात बोलताना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून झुलेलाल महाराज मंदिरासाठी 20 लाखांचा सभा मंडप मंजूर केला असून लवकरच काम सुरू होईल असे स्पष्ट केले.या वेळी उपस्थित समाज भगिनिंच्या आग्रहस्तव महिलांसोबत नृत्य केले व आनंदोत्सवात सहभागी झाल्या. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, दवू तेजवानी, पिंटू शिरसाट, लोकेश साबळे, सचिन दरगुडे,कुणाल विसापूरकर, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख उज्वलाताई खाडे, तालुकाप्रमुख विद्याताई जगताप महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड आदी उपस्थित होते.
