
अंकाई : मनमाड जवळ असलेल्या अंकाई रेल्वे स्थानकावर मालधक्क्यावर औष्णिक विद्युत केंद्रातील राख मालवाहतूक गाडीतून आणली जाते प्लॅटफॉमवर खाली होते, नंतर ती तेथून अन्यत्र ट्रक द्रवारे नेली जाते.मात्र गाडीतून राख उतरविल्यानंतर ती मोठ्या प्रमाणावर हवेने उडत असल्याने परिसरातील शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होते. राखेमुळे या भागातील नागरिकांना जगणे मुश्किल झाले होते. या ठिकाणी कांद्याची लोडिंग होत असल्याने राखेमुळे कांद्याच्या प्रतवारी परिणाम होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आदरणीय डॉ भारती पवार यांच्याकडे दाखल होताच त्यांनी तात्काळ त्याची गंभीर दखल घेत, स्वीय सहाय्यक प्रवीण रौदळ यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. व रेल्वे विभागाशी बोलून अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आदेध दिले. त्यानुसार रौदळ यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच रेल्वेचे अधिकारी , ग्रामस्थ व व्यापारी वर्गाची संयुक्त बैठक घेऊन कैफियत जाणून घेतली. या बैठकीचा अहवाल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना सादर करणार असून लवकरच आदरणीय मंत्रीमहोदय डॉ. भारती पवार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी व रेल्वेमंत्री यांच्याशी संपर्क साधून अंनकाई किल्ल्या रेल्वे स्थानकावर राख न उत्तरविण्याबाबत सूचना करणार आहे. यावेळी डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहायक प्रविण रौदळ , कारटींगएजंट संजय वडनेरे, कांदा व्यापारी सुनील देवरे, सुशील संकलेचा,भाजप नांदगाव तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, रेल्वे वाणिज्य विभागाचे बी.एल.मीना, श्री. कुंभार , ग्रामस्थ अलकेश कासलीवाल, तुषार आहिरे,बाळासाहेब बोराडे, जिवृत्ती घुमरे, अशोक घुमरे, कृष्णा घुमरे,रमेश घुमरे, किशोर बोराडे, बाळू घुमरे, ज्ञानेश्वर घुमरे, उत्तम घुमरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
