
मनमाड : पदवी अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे. परस्परसंवादी शिक्षणाचा एक भाग असल्याने, अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासंबंधित सैद्धांतिक संकल्पनेच्या व्यावहारिक दृष्टीकोनासह वास्तविक कामकाजाच्या वातावरणाचा मोठा परिचय देतात. वरील सर्व बाबींचा विचार करून महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची एक दिवसीय औद्योगिक भेट कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि., गौतमनगर, कोळपेवाडी ता. कोपरगाव, जि. अहमदनगर येथे झाली.
या औद्योगिक भेटीत विद्यार्थ्यांनी प्रोसेस ची सुरुवात व त्याचे पूर्ण प्रॉडक्ट्स मध्ये रूपांतर होण्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास व निरीक्षण केले. यामध्ये साखर कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे वेगवेगळ्या विभागांची व प्रोसेसची जसे चोपिंग, मीलिंग, एक्सट्रॅक्शन ऑफ ज्यूस, क्लेरिफिकेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर केन ज्यूस, क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर, सेपरेशन, पॅकिंग इत्यादीं बाबत माहिती दिली. या भेटीसाठी कारखान्याचे श्री शिरसाट साहेब व प्रवीण निकम साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रसायनशास्त्र विभागाचे प्रा. रोहित शिंदे, प्रा. अभिजीत बुकाने, प्रा. मिलिंद नागरे, प्रा. निकिता देसले यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. तसेच सदर औद्योगिक भेटीसाठी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. राहुल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
