
नांदगाव : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत विविध सेवा पुरविण्यात येत आहेत, आज नांदगाव तालुक्यातील मांडवड गावात हा कॅम्प लावण्यात आला होता, 2 दवाखाना, 2 शासकीय सुविधा कार्यालय, डॉक्टर, सिस्टर, डोळ्यांचे डॉक्टर, सेतू प्रतिनिधी, आशा ताई, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते असा ताफा नागरिकांच्या सेवेत आज कार्यरत होता.सकाळी 10 वाजता उपस्थितांच्या हस्ते नारळ फोडून आजच्या कॅम्प ची सुरुवात करण्यात आली. पी.आर.पाटील सर यांनी आपल्या मनोगतात सर्व सुविधांबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली, सर्व टीम चे स्वागत केले तर आमदारांचे आभार मानले.मांडवड , लक्ष्मीनगर, आझादनगर तसेच मांडवड गावातील नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला.
530 नागरिकांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला तर डोळ्यांची तपासणी केली, यात 306 नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले यात मोठ्या संख्येने वयोवृध्द, व महिलांनी सहभाग घेतला, यात 66 जणांना डोळ्यांची शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून लवकरच त्यांचे मोफत ऑपरेशन केले जाणार आहे. या शिवाय 264 जणांनी सेतू सुविधांसाठी संपर्क केला यामध्ये रेशन कार्ड संबंधित अडचणी तर निराधार योजना, पेन्शन योजनेसाठी अनेकांनी कागदपत्र जमा केली.
मोफत आरोग्य सेवा, डॉक्टरांचा सल्ला, औषधे, डोळ्यांची तपासणी, ड्रॉप, चष्मा, सेतू सुविधांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले. तर मांडवड येथील ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच, कर्मचारी, तसेच गावातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.डॉ.संकेत मार्कंड, डॉ.कीर्ती आहेर, डॉ. आशा जगताप, डॉ.राहुल पाटील यांनी रुग्ण तपासणी केली.या प्रसंगी मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड, जिल्हाप्रमुख किरण देवरे, सरपंच अंकुश डोळे, उपसरपंच विठ्ठल आहेर, अशोक निकम, योगेश आहेर, डॉ.प्रवीण निकम, सागर आहेर, सुधीर देशमुख, पी.आर.पाटील सर, भावराव बागुल, सुनील जाधव, आण्णा मुंढे, लक्ष्मी नगर सरपंच शंकर उगले, अंकुश उगले, रमेश घाडगे, कैलास आहेर, त्रंबक आहेर, सुदाम आहेर, वाल्मीक काकळीज, वाल्मीक थेटे, सर्जेराव थटे, गोरख थेटे, मच्छिंद्र निकम, रंगनाथ पिंगळे, साहेबराव गरुड, बापू हांडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कॅम्प साठी प्रकाश शिंदे, निशांत बोडके, महेंद्र आहेर, सतीश बोरसे, गणेश खैरनार,भरत पारख, ओमकार चिकने, यांनी मेहनत घेतली .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
