
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील चेरमन पदाच्या निवडनुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एका मताने झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून त्याची सुरुवात आमदार राजळेंच्या कासार पिंपळगाव पासुन कधी करायची असा जाहीर सवाल चंद्रशेखर घुले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांना जाहीर सभेत विचारला.जिल्हा बँकेच्या पराभवाचे शल्य महाविकास आघाडीच्या संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या चांगलेच जीव्हारी लागले असून ज्या चार संचालकांनी पक्षाशी गद्दारी करून भाजपच्या उमेदवारांना मतदान केले त्यांच्या वर कडक कारवाई करावी आणि भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, मार्केट कमिटीच्या सर्व निवडणूका मोठ्या ताकदीने त्यांच्या विरोधात लढाव्यात अशा आशयाची एकमुखी मागणी सर्व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात केली.ती सर्व नेत्यांनी मांन्य करून त्याचा नारळ शुभारंभही याच मेळाव्यात करण्यात आला. सर्व नेत्यांनी शेवगाव-पाथर्डीच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वर नाव न घेता कडाडून जोरदार टीका केली. कारण आमदार राजळे या जिल्हा बँक निवडणूकीत बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पँनलमधून निवडणूक लढवून निवडून आलेल्या आहेत. परंतु भाजपच्या नवीन निवडून आलेल्या शिवाजीराव कर्डीले यांचा सर्वात अगोदर प्रथम सत्कार करण्यात मोनिकाताई राजळे यांचा पहीला मान होता यावरून राजळे यांनी कर्डिले साहेब यांनाच मदत केली आहे असा आघाडीच्या नेत्यांचा समज झालेला आहे म्हणून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी चे सर्वच कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले की जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या वेळी पाथर्डी तालुक्यातील आ. राजळे विरोधात वांढेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. आज त्यांना त्याचा रितसर विसर पडलेला दिसतो.संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे यांनीही जिल्हा बँक निवडणूकीत फुटलेल्या संचालकावर वरिष्ठ नेत्यांनी कडक कारवाई अशी मागणी केली.सर्व आक्रमक कार्यकर्त्यांची भुमिका पाहून एकंदरीत शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील सर्वच निवडनुकीत संघर्ष अतिशय धारदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.जेथे संकट गंभीर, तेथे राष्ट्रवादी खंबीर हा नारा क्षितिज घुले यांनी दिला. संजय फडके, संदीप वर्पे,बाळासाहेब जगताप,काकासाहेब नरवडे,सिताराम बोरुडे, साहेबराव आंधळे, बाळासाहेब ताठे,दिनेश गायकवाड, दीपक बटुळे,संदिप राजळे यांच्या सह गेल्या आठ वर्षात घुलेपासुन फारकत घेऊन बाजूला गेलेले अनेक कार्यकर्ते या मेळाव्यात आवर्जून उपस्थित होते.
(प्रतिनिधी सुनिल नजन,अहमदनगर जिल्हा).
