
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) जिल्ह्यात महाविकास आघाडीत जोरदार बिघाडी झाली असुन नुकत्याच झालेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेरमन पदाच्या निवडनुकीत सत्ता धारी गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार चंद्रशेखरभाउ घुले यांचा जिल्हाबँकेत बहुमत असतानाही एका मताने झालेला पराभव हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.सत्ताधारी महाविकास आघाडी गटाची मतदानापुर्वी एका हाँटेलमध्ये बैठक झाली होती त्यावेळी गटाचे १४ संचालक हजर होते.बैठकी नंतर सगळे आपआपल्या वाहनातून मतदानासाठी बँकेकडे गेले. आणि मग पक्षाच्या उमेदवारांला ९ मते कशीकाय पडली. आणि विरोधी उमेदवारांना १० मते ऊमिळाली मग कोणती पाच (पंचमहाभुते) मते कोणत्या अमिषाला बळी पडत फुटली याची जिल्हा भर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा झालेला पराभव हा सामांन्य जनतेला अजिबात पटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अतिशय गदारोळ केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या राजिनाम्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या कडून मागणी करण्यात आली. फुटलेल्या पाच संचालकांची जिल्हाभर “गद्दार”म्हणून अवहेलना करण्यातआली. जिल्ह्यातील अकोले, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा या तालुक्यात संचालकांच्या विरोधात जोरदार आंदोलने करण्यात आली. ना.अजितदादा पवार यांनी घुलेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते मग त्यावेळी फुटीरतावादी संचालक गप्प का बसले होते. त्यांनी तेव्हा विरोध का केला नाही. पक्ष निरीक्षक अंकुशराव काकडे यांच्या कडेही काही विरोधात मतप्रदर्शन केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार हे ही आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तातडीने गुप्त खबऱ्या मार्फत जिल्ह्यातील चालू घडामोडी कडे लक्ष देत पारनेर तालुक्यात तातडीने हजर होते. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वरही जोरदार टीका करण्यात आली. कारण काही फुटीरतावादी संचालक त्यांच्याही गटातील होते.”म्हातारी मेल्याच दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये”गद्दारी करणाऱ्यांचा “करेट कार्यक्रम”करा अशा प्रकारच्या सुचना जिल्हाभर महाविकास आघाडीत घुमत होत्या.महाविकास आघाडी संपूर्ण राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या सर्व निवडनुका एकत्रितपणे लढणार अशा आशयाची बैठक मुंबईत संपन्न झाली.त्या बैठकीत पवार, ठाकरे, पटोले हे उपस्थित होते.त्या बैठकीत लिहलेल्या ठरावाची शाई वाळते न वाळते तोच जिल्हा बँक विरोधकांनी एका मतानं हिसकावून घेतल्याची बातमी राज्यभर झळकली. आणि महाविकास आघाडीची राज्यभर बदनामी झाली. नगर जिल्ह्यात प्रत्यक्ष ताब्यात असलेली जिल्हा सहकारी बँक विरोध पक्षाने हिसकावून घ्यावी याचे शल्य महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलेच जिव्हारी लागले आहे. पवार -थोरात यांच्या उपस्थितीत सर्व संचालकांची एक दिवस अगोदर बैठक होउनही पक्षाचा आदेश न मानणाऱ्या संचालकांना घरचा रस्ता दाखवा अशा आशयाचा नारा जिल्ह्यात दिला गेला.ज्यांनी कोणी मतदान केले नाही त्याची फळे त्यांना आगामी काळात भोगावीच लागणार हे ही आवर्जून सांगितले गेले.ग्राउंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते या नेत्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतात. त्यात त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहात होते.संसार प्रपंचाची होळी करून नेत्यासाठी वाट्टेल ते गुन्हे अंगावर घेऊन हे कार्यकर्ते जिवाची बाजी लाऊन विरोधकांशी दोनहात करत लढतात. आणि हे बेलायक संचालक आपल्या सोईनुसार सोयरेधायरे “सोधा”पक्षाचे राजकारण करतात हे पाहून अतिशय दुःखाने या विश्वास घातकी संचालकांचा जाहीर निषेध नोंदवला गेला.यामुळे अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीत चांगलीच बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. फुटीरतावादी संचालकांना महाविकास आघाडीचे नेते नेमका कोणता धडा शिकवतात हे आगामी काळच ठरवणार आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
