
मुंबई : प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेच्या अंतर्गत ‘जन औषधि दिवस’ तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन राज्यस्तरीय ‘जन चेतना अभियानाचे उदघाटन महामहिम राज्यपाल मा.रमेशजी बैस,केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, नवीन सोना, सार्वजनिक आरोग्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.
