जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, यानिमित्त सुकन्या योजनेचे पासबुक तसेच रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले

0

मनमाड : सौ.अंजुम ताई कांदे यांच्या उपस्थितीत आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधत लाभार्थी महिलांना सुकन्या योजनेचे पासबुक तसेच रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले . सौ.अंजुमताई कांदे यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांसाठी दोन फिरते दवाखाने व दोन सेतू कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लाभ प्रत्येक महिलेने घ्यायचा असल्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले, लवकरच महिलांसाठी गृह उद्योग लघु उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी महिलांना दिली.या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या श्रद्धाताई कुलकर्णी, कल्पनाताई दोंदे, विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, पूजाताई छाजेड रोहिणीताई मोरे, सरलाताई घोगळ, सुरेखा ढाके,नाजमा मिर्झा, नीता लोंढे, नीतू परदेशी, प्रतिभा अहिरे, संगीताताई सांगळे, लक्ष्मीताई अहिरे, अलकाताई कुमावत तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here