महाविकास आघाडीच्या गायकर,गायकवाड, जगताप, घुले यांना धोबीपछाड देत भाजपच्या शिवाजीराव कर्डीले यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेरमन पदी निवड !

0

(सुनिल नजन/अहमदनगर)
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडनुकीत महाविकास आघाडीच्या गायकर, गायकवाड, जगताप, घुले यांना धोबीपछाड देत भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले हे एका मताने निवडून आले आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एका मताने पराभव केला आहे. शिवाजीराव कर्डीले यांना १० मते तर चंद्रशेखर घुले यांना ९ मते मिळाली आहेत. एक मत बाद झाले आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे एकूण २१संचालक होते. पैकी माजी चेरमन अँड. उदयराव शेळके यांचे अचानक निधन झाल्यामुळे चेरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. चेरमन पदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सिताराम गायकर, प्रशांत गायकवाड, राहुल जगताप, चंद्रशेखर घुले आणि महिलांच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळे,आणि अनुराधा नागवडे ही नावे चेरमन पदाच्या शर्यतीत होती.महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे येउन घुलेंच्या नावावर चेरमनपद शिक्कामोर्तब केले होते. पण ऐनवेळी भाजपाचे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी ऐनवेळी वेगळीच खेळी खेळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चारीमुंड्या चितपट करीत भाजपचे शिवाजीराव कर्डीले यांना विजयी केले. सन.२०२० मध्ये झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडनुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे१०, राष्ट्रीय काँग्रेसचे ४,भाजप ६,आणि शिवसेना १,असे पक्षीय होते. आता झालेल्या निवडनुकीत भाजपचे शिवाजीराव कर्डीले यांना१० मते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना ९ मते मिळाली, एका मतदाराने तटस्थ भूमिका घेतल्यामुळे ते मत बाद झाले. लोकशाही मध्ये एका मताला किती किंमत असते हे या निवडणुकीत सर्व सामान्य माणसाला समजले आहे. “उतावीळ नवरा, आणि गुढग्याला बाशिंग”या म्हणीप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडत असतानाच घुलेंच्या एस्टीच्या पुढे पळणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले हे निवडून आल्याच्या पोस्ट हाँटसाँपवर शेअर करून आपल्या अकलेचे तारे तोडत निकालाबाबत जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी चढाओढ केल्याने अनेकांचा निकाला संदर्भात गोंधळ उडाला. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्या घोषित निकालानंतर पराभूत उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी आपले मोबाईल बंद करून ठेवले होते.एकंदरीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेरमन पदाच्या निवडणूकीत बाजी मारून विखे पिता पुत्रांनी आपणच जिल्ह्यातील प्रमुख बाँस असल्याचे सीद्ध केले आहे.विरोधी पक्ष नेते ना. अजित पवार यांच्या महाविकास आघाडीचे मते फुटल्याने आघाडीला या निवडनुकीत “महाभकास”व्हावे लागले अशी संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.विखेंचा करिष्मा अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे हे या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here