
रायपूर : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रजतलाब, रायपूर येथील जिल्हा रुग्णालय आणि अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटरला भेट देऊन दोन्ही केंद्रांच्या कामांचा आढावा घेतला यावेळी आरोग्य अधिकार्यांना लक्षात आलेल्या काही उणिवा दूर करण्याचे निर्देश दिले जेणेकरुन सर्व नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविल्या जातील आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार “सर्वांसाठी आरोग्य सेवा” ही संकल्पना साध्य होईल.
