
पाचोरा- ( प्रतिनिधी) –
कृषी उत्पन्न बाजार समिती,पाचोरा/भडगाव यांच्या मार्फत भारतीय कापस निगम लि.(C.C.I) यांच्या माध्यमातून दि.०९/०५/२०२० पासून पूर्ववत कापूस खरेदी सुरु झालेली आहे. त्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून फोन द्वारे नाव नोंदणी करून घेतली जात आहे. त्यासाठी आज पावेतो अंदाजे ५००० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केलेली असून शेतकऱ्यांचा नाव नोंदणीचा प्रतिसाद पाहता पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून अजून ४००० शेतकऱ्यांची नाव नोंदणी होऊ शकते परंतु भारतीय कापस निगम लि.(C.C.I) मार्फत रोज फक्त २० वाहनांमधून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे ही परिस्थिती बघता पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा कापूस खरेदी करण्यास खूप कालावधी लागू शकतो.
शेतकऱ्यांचा या सर्व समस्यांचा आढावा घेवून भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी या विषया संदर्भात मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले. या वेळी त्यांनी कोरोना (कोविड-१९) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती बघता शेतकऱ्याला शेतीमाल विकणे अवघड झालेले आहे. तसेच होऊ घातलेला पावसाळा व खरीप हंगामाच्या पूर्व तयारी साठी शेतकरी बांधवांना लागणारा पैसा हा त्यांचा शेतीमाल विक्री झाला तरच उपलब्ध होऊशकतो. म्हणून जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यास शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांवर मार्ग निघू शकेल अशी विंनती भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.
(प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती,पाचोरा-भडगाव चे सभापती- सतीष शिंदे)
कृषी उत्पन्न बाजार समिती,पाचोरा-भडगाव चे सभापती सतीष शिंदे यांनी या आधी मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव व म.जिल्हा उपनिबंधक जळगाव तसेच संबधित विभागांना वेळोवेळी पत्रव्यवहार व चर्चा करून पाचोरा येथे भारतीय कापस निगम लि.(C.C.I) यांच्या मार्फत कापूस खरेदी केंद्र पुर्ववत सुरु केले. बाजार समिती पाचोरा-भडगाव यांच्या मार्फत कोरोना विषाणू मुळे होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व प्रथम शेतकऱ्यांचा कापूस मोजणी करिता फोन द्वारे नाव नोंदणी सुरु केलेली आहे. तसेच भडगाव येथील कापूस पणन महासंघ (फेडरेशन) द्वारे कापूस खरेदी केला जात असतो परंतु यापूर्वी कापूस खरेदी करून प्रोसेसिंग झालेला माल (कापसाच्या गाठी) भडगाव कापूस खरेदी केंद्रातून उचलला गेलेला नाही त्यामुळे जिनिंग मालक कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास असमर्थता दाखवत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती,पाचोरा-भडगाव यांच्या मार्फत पाचोरा भडगाव तालुक्यातून आज पर्यंत अंदाजे १,९१,००० क्विंटल विक्रमी कापूस खरेदी झालेली आहे. तसेच मागील १० वर्षातील हा उचांक आहे. लॉक डाऊन काळात जिल्ह्यात इतर बहुतांशी बाजार समित्या बंद असतांना देखील कृषी उत्पन्न बाजार समिती,पाचोरा-भडगाव यांनी एप्रिल महिन्यात शोशल डीस्टन्सिंग पाळून मास्क व सॅनीटायझरचा वापर करून आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन उच्चांकी ९०,००० क्विंटल भुसार या शेतीमालाची खरेदी केली व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ती काळजी घेऊन बाजार समिती व कापूस खरेदी केंद्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी आम्ही कायम स्वरूपी प्रयत्नशील राहू असे बाजार समितीचे सभापती सतीष शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच बाजार समिती सुरळीत चालू ठेवण्यासाठी बाजार समितीचे उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले,संचालक नरेंद्र पाटील,दिलीप पाटील,सिंधुताई शिंदे,सुनंदाताई बोरसे,धोंडू हटकर, गनी शा, प्रिया संघवी आणि इतर संचालकांसह बाजार समितीचे सचिव बी.बी.बोरुडे व कर्मचारी,व्यापारी,हमाल मापाडी व सर्व शेतकरी बांधवांसह सर्वांनी सहकार्य केले.
