
आसाम : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या गोलपारा,आसाम जिल्ह्याच्या भेटीदरम्यान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विविध क्षेत्रात सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतला. आरोग्य उपक्रमांचे लाभ जनतेला मिळावेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्य़ाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करता यावा यासाठी गोलपारा ह्या आकांक्षी जिल्ह्यचा विशेष आढावा घेण्यात आला.
