
(सुनिल नजन अहमदनगर) “अहिल्यानगर” हे नामांतर करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील जे जे आमदार आपल्या बरोबर येत असतील ते आपले, असे उदगार धनगर समाजाचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांनी काढले ते अहमदनगर शहरातील नामांतरासाठी झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.डफळ पुढे म्हणाले की ग्रामपंचायती पासून तर थेट खासदारकी पर्यंतच्या सर्व निवडनुकीत धनगर समाजाच्या उमेदवारांनी आता उभे राहिले पाहिजे आणि समाजाची ताकद दाखवून दिली पाहिजे. प्रस्थापित समाजातील नेत्यांनी धनगर समाजाचा फक्त मतापुरताच वापर केलेला आहे.सर्व पक्षांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते आणि सत्तेवर आल्यानंतर जाणून बुजून हेतुपुरस्कर का टाळले आहे याचा विचार समाजाने आता केला पाहिजे. राज्यात दोन नंबरचा समाज असताना राज्यकर्ते समाजाला का टाळतात याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.आपण संघटीत नसल्यामुळे समाजावर ही वेळ आली आहे. धनगर समाजातील ज्यांनी ज्यांनी समाजाच्या नावाखाली सत्ता भोगली त्यांना ही समाजाचे काही देणे घेणे राहिले नाही. धनगर समाजाच्या नेत्यांनीही आपल्या स्वार्थापोटी समाजाला वेठीस धरले आहे असा आरोप ही डफळ यांनी त्या नेत्यांच्या नावानिशी केला आहे. नगर शहरात असुनही समाजाचे आमदार या सभेला अनुपस्थित रहील्यामुळे त्यांच्या विरोधात ही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.ज्या नेत्यांनी मतासाठी समाजाचा वापरच केला त्यांनाही आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.धनगर नेत्यांना नामांतराच्या सभेला येण्यासाठी लाज वाटते काय असा सवालही जाहीर सभेत नेत्याचे नाव घेऊन विचारण्यात आला आहे.या सभेला नामांतर क्रुतीसमितीचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)
