
नाशिक : गोखले शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात नवे युग निर्माण केले असून, विकासाची दूरदृष्टी ठेवणारे सर डॉ. मो. स. गोसावी संस्थेच्या माध्यमातून समाजिक विकास घडवत शिक्षणातून संशोधनाला वाव देत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.डॉ. मो. स. गोसावी यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची दिली आहे. सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत प्रगती करण्याचे आवाहनही डॉ. भारती पवार यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. बी. पंडित, प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. राम कुलकर्णी, डॉ. सुहासिनी संत प्रकल्प, प्रदीप देशपांडे, शैलेश गोसावी, डॉ. मीना चंदावरकर,डॉ. आर. पी. डॉ. मो. स. गोसावी देशपांडे उपस्थित होते.
