नायगव्हाण ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0

येवला : येवला तालुक्यातील नायगव्हाण ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज १९ फेब्रुवारी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेतील मुलांनी राजेंनी वेगवेगळ्या मावळ्याना सोबत घेऊन केलेल्या पराक्रमाची आठवण आपल्या भाषणातून करून दिली तसेच छोट्या चिमुकल्यांनी राजेंची वेशभूषा करून ग्रामस्थ व शिवभक्तांना आकर्षित केले,शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक काकड सर व जाधव सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबदल माहिती सांगितली. सदर प्रसंगी गावचे सरपंच सुनिल साळवे, सदस्य संतोष बाबुराव सदगीर,निलेश जोरवर, संतोष दिघे, ज्ञानेश्वर बबन सपकाळ, शिवाजी पवार यांच्या सह ग्रामपंचायत संगणक परिचालक भाऊसाहेब गाढे, शिपाई सचिन भोसले, रोजगार सेवक सुनिल शिंदे, मुख्याध्यापक श्री.काकड सर,श्री.जाधव सर,श्री.वर्पे सर,अंगणवाडी सेविका आश्र्विनी पुराणिक मॅडम आदींसह गावातील तरुण मंडळी नाना गायकवाड, नवनाथ गाढे, धनंजय शिंदे, सचिन शिर्के, दत्तू दिघे, दादासाहेब बारहाते,बाबासाहेब मांजरे, रखमा सोनवणे, कारभारी सदगीर, भावराव शिर्के, दीपक बारहाते, दत्तू सदगीर, सचिन बागल, संदेश पानपाटील,भूषण पानपाटील, रघुनाथ शिंदे, बबन जोरवर, शांताराम सदगीर, भाऊसाहेब कांदळकर, श्रावण सदगीर, साईनाथ गायकवाड, सचिन पानपाटील,बबन बारहाते, संदीप जाधव, देविदास शिंदे, रुपेश व्हडगळ, काळू मोरे, निवृत्ती वाघ, अशोक सोनवणे, धनंजय पवार, संतोष मांजरे, विनायक सदगीर,श्रावण कांदळकर, अशोक बारहाते, भिमराव पानपाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here