धानोरा येथे काशिविश्वेवर संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी

0

सिल्लोड प्रतिनिधी:- ( विनोद हिंगमिरे ) महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र काशिविश्वेवर आश्रम धानोरा, तसेच प.पु ब्रम्हलीन काशिगीरी महाराज यांचे जन्मस्थळ असेलेल्या धानोरा या जन्मगावी हजारो भाविकांनी दर्शन घेतले ,सकाळीच चार वाजता संस्थानचे पिठाधिशी प.पु.बा.सर्वानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते रुद्राअभिषेक करण्यात आला.त्यानंतर सकाळी अकरा वाजता काशिनाथ हनुमात खोमणे, नरेंद्र हनुमंता खोमणे, भगवान काशिनाथ खोमणे,आ गजानन मंदिर औरंगाबाद, यांच्या हस्ते लहुरुद्रा अभिषेक,आरती, महाप्रसाद करण्यात आले, खोमणे परिवार, यांनी फराळाचे आयोजन हि केले होते.या प्रसंगी सांडु पा.लोखडे,नाना पा.पालोदकर , ज्ञानेश्वर पा.काकडे सरपंच, नारायण काकडे, मच्छिंद्र काकडे, अंकुश फुके, हरिदास काकडे, संजय महाराज, तुकाराम काकडे, काशिनाथ दौंड, जगन्नाथ काकडे, रामकृष्ण लकडे, शिवाजी विसपुते, काकासाहेब शेठ,हरिचंद्र कदम,केळगाव येथील यादवराव पा.जाधव,जगन पा.कावले, विष्णु मख,बाळु ईवरे, सिताराम मोरे,बापु ईवरे, सोमनाथ कोल्हे, विश्वनाथ शिंदे, संतोष जाधव, सोमनाथ आप्पा ज्ञाने,नरेश गरुड,राजु दाभाडे,मंजित दाभाडे, कृष्णा जाधव,श्रीराम पा कोल्हे,दिपक ज्ञाने, दत्तू महाराज काशीगीर महाराज यांचे बंधु दत्तू भागजी हावळे, जगन हावळे अदिसह भक्त परिवार उपस्थित होते,या प्रसंगी प.पु.ब्रम्हलीन काशिगिरी महाराजयांच्या मातोश्री तान्हाबाई भागाजी हावळे,व काशिविश्वेर संस्थान धानोरा येथील पिठाधिशी प.पु.बा.सर्वानंद सरस्वती महाराज यांनी येणाऱ्या सर्व भविकांचे स्वागत करुन शुभाअशिर्वाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here