सावरगाव येथे एकलव्य जयंती साजरी

0

येवला : तालुक्यातील सावरगाव येथे भगवान एकलव्य जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. . सुरवातीस भगवान एकलव्य यांचा प्रतिमेला वंचित चे तालुका उपाध्यक्ष मुक्तार तांबोळी,नवनाथ पगारे,सरपंच प्रताप पाचपुते,शिवसेनेचे युवा नेते शरदपवार ,नाना पानमळे,लहू लोखंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांचे गोरख जाधव,प्रवीण घोडेरावं,विशाल काटे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महाशिवरात्री निमित्ताने फराळ वाटप करून गावातील सर्वच लोकांनी एकोप्याने या जयंती निमित्त सहभागी होत विर एकलव्य जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी सर्वधर्म समभाव जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनीही गाण्याचा तालावर सुर धरत ठेका घेतला होता यावेळी पोपट लोखंडे, भिवसेन पगारे,भाऊसाहेब लोखंडे,अशोक बर्डे,संतोष माळी,शंकर लोखंडे,मोतीराम पगारे, अन्वर तांबोळी, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here