
मालेगाव : अजंग ता. मालेगाव येथे 108 कुंडात्मक अतिरुद्र महायज्ञ सोहळा प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यज्ञ सोहळ्यात सहभाग घेतला. आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती महाराज व स्वामी प्रियमजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी शामराव डोळे यांनी हा यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोहळ्यास सुरेश नाना निकम, दादाभाऊ जाधव,अरुण माऊली, मदन गायकवाड, दिपक देसले, गणेश शिंदे, विकी खैरनार, लकी आबा गिल, संदीप पाटील, सुरेश काळे, विनोद शेलार, नितीन फोपळे व समस्त भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
