प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिवशक्ती भवन माधवनगर येथे 87 वी त्रिमूर्ती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

0

मनमाड : आज ८७ वी ञिमुर्ति शिवजयंती प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्याल शिवशक्ती भवन , माधव नगर मनमाड येथे मोठ्या उत्साहाने साजरी झाली.या प्रसंगी डाँ.प्रताप गुजराथी , डाँ .सुहास डोंगरगावकर, डाँ.वसूधा डोंगरगावकर मँडम , डाँ.राठी , डाँ.अर्चना राठी, श्री .दाऊ तेजवाणी , नगरसेविका सौ.उषा तेजवाणी , मतकर मँडम (समाजसेविका) , सौ.अन्नपूर्णा अडसूळे मँडम(मनमाड शहर अंगणवाडी अध्यक्षा) , गुरुगोविंद सिंग हायस्कुल चे प्राचार्य श्री .सुतार सर,मुख्याध्यापिका.सौ.नायर मँडम , श्रीमती .संगिता बागुल मँडम (महिला शहर प्रमुख शिवसेना), सौ.कमलताई वाल्मीक आंधळे उपस्थित होते.मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करुन दिपप्रज्वलनाने महाशिवराञीचे उदघाटन केले.कुमारी अर्शिता देवरे या विद्यार्थीनीने शिव मेरी पूजा,सत्यंम शिवम सुंदरम,चहक उठी है वादीया या गाण्यांवर नृत्य सादर करुन सर्वांना मंञमुग्ध केले.सौ.जयश्री झाल्टे मँडम यांनी प्रजापिता ब्रम्हाकुमारी संस्थेचा परीचय करुन दिला.आदरणीय राजयोगीनी ब्रम्हाकुमारी शितल दिदींनी शिवराञी चे रहस्य व महत्त्व पटवून दिले.अमृता दिदींनी तीन उपवासांची माहिती सांगितली.कँडल लायटींग व केक कटींग करुन परमपिता शिव परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा केला.डाँ.प्रताप गुजराथी व डाँ.वसुधा डोंगरगावकर मँडम यांनी आपले मनोगत व मेडीटेशन विषयी माहीती सांगितली .मान्यवरांचे हस्ते शिवध्वजारोहन करुन , महाप्रसादाचे वाटप करुन सर्वांचे आभार मानून सौगात देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री .सूर्यकांत जाधव सर यांनी केले.बहुसंख्य माता व भगिनी कार्यक्रमाला हजर होते.कार्यक्रम यशस्वीतेसाढी श्री .भास्कर भाई,रविभाई,लताबहन,व सर्व बि.के भाऊ  -मातांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here