
नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत श्रेष्ठदान महाअभियान या दोन दिवसीय अधिवेशनाचा रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात समारोप झाला.अवयवदान हे एक पवित्र कार्य असून, या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करणार आहे. या कामातून सातत्याने जनसेवा घडत राहील, असे प्रतिपादन भारती पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ. भाऊसाहेब मोरे, सुनील देशपांडे, पुरूषोत्तम पवार उपस्थित होते.
