
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया,आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे आयुर्वेदिक एकीकृत औषधी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, आयुष राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई मुंजपरा आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा हेही उपस्थित होते.
या आयुर्वेदिक एकीकृत औषधी केंद्रात अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक अशा दोन्ही प्रकारच्या सर्वोत्कृष्ट औषधे उपलब्ध असतील.माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच एकात्मिक औषध प्रणालीला प्रोत्साहन दिले आहे जे सर्वांगीण आरोग्य सेवेमध्ये प्रशंसनीय कार्य करत आहे.
