बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेबाबत च्या किचकट नियमांच्या बेड्या मुख्यमंत्र्यांनी तोडाव्यात

0

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार सत्यवान तेटांबे यांचे आवाहन………
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 30 वर्षे पूर्णवेळ पत्रकार म्हणून सेवा केल्याचा एक लिखीत नियम आहे. हा नियम शिथिल करावा.आणि याबाबत असलेल्या या नियमांच्या बेडया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडाव्यात.घरादारावर तुळशीपत्र ठेवून रात्रंदिवस समाज सेवा करणाऱ्या सर्वच पत्रकारांना या सन्मान योजनेचा लाभ मुख्यमंत्र्यांनी मिळवून दिला पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सत्यवान तेटांबे यांनी केले. धर्मवीर आनंद दिघे विशेषांक चे संपादक तेटांबे हे आहेत.या विशेषांकाचे प्रकाशन ठाणे आनंद स्मृति स्थळ येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थित या विशेषांकावर चर्चासत्र झाले त्यावेळेस बोलताना तेटांबे यांनी वरील मागणी केली.चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक दिपक दळवी हे होते.तेटांबे पुढे म्हणाले सरकार अनेक चांगल्या योजना राबवते. परंतु या योजनांचा लाभ योग्य व्यक्तींना होत नाही.कारण त्या ठिकाणी योग्य व्यक्तींची निवड करणे महत्त्वाचे आहे. नियमावर बोट ठेवून चांगल्या योजनांना फाटे फोडले जात आहेत. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एक अधिकारी त्यांच्या कानात सांगू लागले,दादा हे नियमात बसत नाही.त्यावर दादा म्हणाले नियमात नसेल तर नियमात बसवा. नियम हे माणसांसाठी बनवलेले असतात. मुख्यमंत्री दादांच्या या प्रत्युत्तरावर तो अधिकारी गारद झाला. दादां प्रमाणे शिंदे हेही झटपट निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आता बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना निवृत्त पत्रकारांना लागू करण्यासाठी असलेल्या किचकट नियमांच्या बेडया तोडल्या पाहिजेत.30 वर्षे दैनिकात नोकरी करणारा पूर्णवेळ पत्रकार असावा असा नियम या योजनेबाबत आहे, हा नियम शिथिल करावा अशी सर्वच पत्रकार बंधू भगिनींची अपेक्षा आहे असे तेटांबे यांनी यावेळेस सांगितले. महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक दिपक दळवी म्हणाले ध्येयवादी,ज्येष्ठ पत्रकारांचा बाळ शास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ झाला पाहिजे. सरकारने नियमावर जरूर बोट ठेवावे. परंतु आपण अयोग्य माणसाला या सन्मान योजनेचा लाभ देत नाही ना? असा सवालही दळवी यांनी केला. धर्मवीर आनंद दिघे विशेषांकावरील चर्चासत्रास महाराष्ट्र जनमुद्रा चे संपादक दिपक दळवी, आनंद दिघे यांचे मित्र डाॅ. कर्मवीर गोडसे, डाॅ.सदानंद विचारे, कुटुंब रंगलय काव्यात फेम विसुभाऊ बापट,आनंद दिघे यांचे चाहते कवी लेखक अण्णा धगाटे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, आदिवासी सेवक गंगाधर म्हात्रे,अशोक उतेकर, विष्णू यादव, अनिल मुकणे आदींसह आनंद दिघे यांचे हजारो चाहते याप्रसंगी उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे विशेषांकाचे मुल्य ₹ 200 आहे.अंक मिळवण्यासाठी- साक्षीदार प्रकाशन,सत्यवान तेटांबे डी/303, क्रेमलिन जयराज नगर बोरिवली पश्चिम मुंबई-91,मोबाईल:9869501368 या पत्त्यावर संपर्क करावा….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here