
येवला : परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षातील बाबासाहेबांच्या यशातील सिंहाचा वाटा असलेली त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सर्व गट तट विसरून एकोप्याने बौद्धांची धार्मिक संस्था ‘भारतीय बौद्ध महासभा’ अंतर्गत त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी करताना प्रारभी माता रमाई तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमा पूजन करून सामूहिक बुध्द पूजा घेण्यात आली.भारतीय बौद्ध महासभेचे भाऊसाहेब जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यागमूर्ती माता रमाई तसेच धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय भाऊ पगारे यांनी माता रमाई यांचा त्याग यावेळी स्पष्ट केला. बीएसपी चे येवला तालुका प्रमुख पौलस आहीरे, यांनी देखील रमाई चे संघर्षमय जीवन व्यक्त केले. तसेच येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम यांनी देखील आपले विचार मांडले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय कुमार भाऊ मेघे, समता सैनिक दलाचे संरक्षण प्रमुख विनोद त्रिभुवन ,बाळासाहेब कसबे R.P.I, भाऊसाहेब झालटे भागिनाथ पगारे, भगवान साबळे, दीपक लाठे, सचिन साबळे, रेखा साबळे वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा उपाध्यक्ष, पौर्णिमा गरुड, दयानंद जाधव, पोपट खंडागळे, रामभाऊ केदारे, अशोक पवार ,राहुल सोनवणे, सागर पडवळ आदी उपस्थित होते सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस दीपक जी गरुड यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद त्रिभुवन यांनी मांडले . कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण करून करण्यात आली.यावेळी सर्व धम्म बांधव उपस्थित होते.
