मनमाड शहरातील शेकडो महिलांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्ष प्रवेश

0

मनमाड : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विकासाचा झंजावात आणि सौ.अंजुम ताई कांदे यांचा महिला वर्गात असलेला मोठा जनसंपर्क पाहता मनमाड शहरातील मोठा महिला वर्ग सामाजिक कार्यात काम करण्यासाठी पुढे येत आहेत.सौ.अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी सतत मनमाड कर महिलांच्या अडी अडचणी सोडवण्यात सक्रिय असतात. विविध सांस्कृतिक उपक्रम, महिलांच्या व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, महिलांच्या अडी अडचणी चे त्वरित निवारण करण्यासाठी महिला आघाडी नेहमीच सहकार्याची भूमिका घेत असतात. यामुळेच मनमाड शहरातील असंख्य महिला शिवसेना महिला आघाडीत काम करण्यास उत्सुकता दाखवत आहे. सोमवारी शिवसेना संपर्क कार्यालयं मनमाड येथे शेकडो महिलांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. सौ अंजुमताई कांदे यांनी महिलांना शिवबंधन बांधले. या प्रसंगी महिलांशी त्यांनी संवाद साधला. प्रत्येक महिलेने फक्त चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडले पाहिजे, कुटुंबाचा गाडा चालवताना स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करायला पाहिजे, आणि या साठी आम्ही महिला आघाडी आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.मनमाड शहरातील महिलांच्या जिव्हाळ्याचा कित्येक वर्ष प्रलंबित असलेला पाणी प्रश्न आमदारांनी सोडवल्या बद्दल उपस्थित महिलांनी आभार व्यक्त केले. न भूतो न भाविष्यती असे आमदार व महिला नेतृत्व लाभले या साठी त्यांनी देवाचे आभार मानले. या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख विद्या ताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजा छाजेड, सरला गोगळ, नाजमा मिर्झा, सुरेखा ढाके, लक्ष्मी अहिरे, प्रतिभा अहिरे, संगीता सांगळे, नीता लोंढे आदि सह महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here