
चांदवड : शनिवार दि.4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता जि.प.शाळा-गांगुर्डेवस्ती , ता-चांदवड ,जि-नासिक येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी सौ.रविना विष्णू सोनवणे ( सरपंच -निंबाळे),श्री .अनिल भोसले (उपसरपंच निंबाळे ) श्री .मन्साराम अहिरे (शिक्षण विस्तार अधिकारी- दुगाव बीट )श्री .दिपक आत्माराम घुमरे, सौ.लता बाळकृष्ण गांगूर्डे ,सौ.सुनिता सचिन सोनवणे , सौ.मनिषा रविंद्र सोनवणे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.शारदा सोपान सोनवणे , मनिषा दत्तू गांगूर्डे , मोनाली समाधान गांगूर्डे ,वैशाली ज्ञानेश्वर गांगूर्डे ,पूष्पा नितिन गांगूर्डे , वैशाली चांगदेव सोनवणे , द्त्ताञेय देवराम घुमरे,महेंद्र निवृत्ती सोनवणे , ज्ञानेश्वर एकनाथ गांगूर्डे , गोरखनाथ सोनवणे , गणेश कोल्हे,प्रविण निंबाळकर हे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमती .गवळी मँडम यांनी केले.बहुसंख्य माता पालकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला .इयत्ता 1ली ते 4थी च्या मुलांनी सादर केलेल्या बहारदार गाण्यांनी सर्व मंञमुग्ध झाले.कार्यक्रमाच्या शेवटी डाँ.नितिन गांगूर्डे ( माजी पंचायत समिती सभापती-चांदवड)यांनी भेट दिली. उपस्थित मान्यवरांनी मुलांचे कौतूक केले रोख स्वरुपात बक्षिसे दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश शिंदे सर, प्रकाश खैरे सर यांनी मदत केली.कार्यक्रमाचे सुञसंचलन सूर्यकांत जाधव सर यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
