येवला : गौतम बुद्धांचा अस्थी रथ मुक्तीभूमीत दाखल . महाधम्म पद यात्रेचे जोरदार स्वागत .धम्म पद यात्रेत 110 भंतेजीचा सहभाग, गौतम बुद्धांचा अस्थी कलश घेऊन निघालेल्या थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्षू संघ यांचा नेतृत्वाखाली या धम्म पद यात्रेचे आयोजक गगन मलिक व सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा मार्गदर्शनाखाली परभणी ते चैत्यभूमी दादर अशा जाणाऱ्या पद यात्रेचे येवला मुक्तीभूमीत भारतीय बौद्ध महासभेचे वतीने तसेच बौद्ध उपासक उपासिकानी फुले पुष्प चरणी अर्पण करून मुक्ती भूमीत जोरदार स्वागत करण्यात आले. . गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी महानिर्वाण झालेल्या बुद्ध अस्थी आजतागायत जतन करून ठेवत धम्म पद यात्रेचा निमित्ताने थायलंड आंतरराष्ट्रीय भिक्षू संघाचा मांध्यमतून मुक्ती भूमी वासियांना अहिंसेच प्रतीक डोळ्यांनी पाहिला व दर्शन करण्यास मिळाल्याने बौद्ध उपासक मुक्ती भूमीत. जन्मल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते असे बोल बौद्ध उपासक यांचा कडून याप्रसंगी बोलत होते. यावेळी मुक्ती भूमी परिसर सफेद वस्त्र परिधान करून आलेल्या उपासक उपासिका यांचा शांततेचं वातावरणाने खुलून दिसत होते. प्रसंगी भिक्षू संघाने सामुदायिक त्रिशरण ,पंचशील तसेच धम्म देसना उपस्थितांना देऊन मंत्रमुग्ध केले. यावेळी. भारतीय बौद्ध महासभेचे भाऊसाहेब जाधव,भाऊसाहेब झालटे,दिपक गरुड,भगवान साबळे,विनोद त्रिभुवन, दिपक लाठे,बाळू कसबे,राजाभाऊ बनसोडे, संजय पगारे, साहेबराव भालेराव, पोपट खंडागळे, सुभाष गांगुडे,यांनी धम्म पद यात्रा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली,