मनमाड शहरातील आठवडे बाजारातुन मोबाईल चोरी करणारे आरोपीतांना अटक व दोन मोबाईल जप्त

0

मनमाड :  शहरातील आठवडे बाजारातुन मोबाईल चोरी करणारे आरोपीतांना अटक व दोन मोबाईल जप्त याबाबत माहिती की , दिनांक २ ९ – ०१-२०२३ रोजी मनमाड शहरातील रविवारी भरलेल्या आठवडे बाजारातुन आठवडे बाजारात बाजार खरेदी साठी आलेल्या दोन लोकांचे मोबाईल चोरीस गेले होते . त्याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यावरुन मनमाड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री प्रल्हाद गिते यांनी लागलीच आठवडे बाजारात पेट्रोलिंग साठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या असता आठवडे बाजारात साई प्रसन्न लॉन्स समोर संशयास्पद हालचाल करतांना मिळुन आलेले ०१ ) सुनिल कोयल पवार वय २२ वर्ष, ०२ ) लकी परबेसिंग सोलंकी वय २० वर्ष दोन्ही राहणार २८ , मेनरोड , उनिदा भोपाल मध्यप्रदेश यांची चौकशी करुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात गुन्हयात चोरीस गेलेले दोन मोबाईल व एक मोटारसायकल मिळुन आली . आरोपीतांना गुन्हयात अटक करुन त्यांना मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा . न्यायालयाने त्यांची दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे . आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . सदरची कारवाई मा . श्री . शहाजी उमाप , पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण , मा . श्री . अनिकेत भारती , अपर पोलीस अधिक्षक , मालेगांव , मा.श्री समिरसिंह साळवे , उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री प्रल्हाद गिते . पोना गणेश नरोटे , पोना मुदस्सर शेख पोशि गौरव गांगुर्डे , पोशि राजेन्द्र खैरनार , पोशि रणजित चव्हाण , पोशि संदिप झाल्टे , पोशि राहुल बस्ते , म,पोशि सपना गवांदे यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here